कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीदिनानिमित्त आज कल्याण - डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी महापालिका मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपआयुक्त धैर्यशील जाधव, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पसुमने वाहून अभिवादन केले.
महापालिकेच्या डोंबिवली विभागातही परिमंडळ-२ चे उप आयुक्त रमेश मिसाळ यांनी जुन्या विभागीय कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि फ प्रभाग कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप, राजेश सावंत, संजय कुमावत, तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कल्याण पूर्व येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरात (ड प्रभाग) असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास परिमंडळ -१चे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहा. आयुक्त धनंजय थोरात, हेमा मुंबरकर, सविता हिले त्याचप्रमाणे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.