Nashik loksabha : नाशिक लोकसभेतून छगन भुजबळ यांची माघार



नाशिक  :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. मात्र उमेदवारी जाहीर होण्यास होत असलेला विलंब पाहता छगन भुजबळ यांनी स्वतःहा पत्रकार परिषद घेत आपण माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. दिल्लीत आपल्या नावावर अमित शहांनीच शिक्कामोर्तब केले होते. पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर होत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

भुजबळ म्हणाले की, नाशिकचा तिढा सुटलेला अद्याप तरी दिसत नाही. जेवढा उशीर होईल तेवढं नाशिकच्या जागेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ताबोडतोब निर्णय घेणे गरजेचे आहे. कोण जागा लढवणार, कोण उमेदवार हे आतापर्यंत जाहीर होणे गरजेचे होते,
अन्यथा अडचण निर्माण होईल. प्रतिस्पर्धी कामाला लागले आहेत. जागेबाबत संदिग्धता असल्याने ही संदिग्धता आपण दूर करायला हवी. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांच्या बैठकीत काय घडले हे सांगत असताना भुजबळ यांनी होळीच्या दिवशी आम्हाला अजित दादांचा निरोप आला म्हणून देवगिरीवर गेलो. तिथे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे बसले होते. आम्हाला कशाला बोलावले असे आम्ही विचारले असता अजित पवार यांनी दिल्लीवरून आल्याचे सागितले. दिल्लीत अमित शहा यांच्याशी बैठक झाली. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. जागावाटपावर चर्चा झाली. नाशिकच्या जागेबाबत अजित पवार म्हणाले की आमचे आमदार आहे आणि आम्हाला जागा द्यावी. त्यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील. तर अमित शहांनी नाही म्हणत छगन भुजबळ उभे राहतील असे सांगितले. शिंदेंनी आमची जागा असल्याचे सांगितले मात्र तिथून भुजबळच लढतील अस दिल्लीतून स्पष्ट केल्याचे पवारांनी सांगितले. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील माझ्या लढण्याबाबत हट्ट धरल्याचे भुजबळांनी सांगितले.

आपल्या उमेदवारीबाबत दिल्लीत ठरलेले खरे आहे का हे विचारायला फडणवीसांना फोन केला. त्यांनीही केंद्रातून मलाच उभा रहायचे असल्याचे स्पष्ट केले. बावनकुळेही म्हणाले मोदींचा निरोप होता आणि अमित शहांनी सांगितलंय तुम्हीच उभा रहायचंय. पहिल्या आठवड्यात उमेदवारी जाहीर करायला हवी होती. पण नंतर चर्चा सुरू झाल्याचे समजले, तीन आठवडे गेले. होळीवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होऊन तीन आठवड्यांपासून प्रचार सुरू आहे. अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही असेही छगन भुजबळ यांनी सांगत आपणच माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.



Post a Comment

Previous Post Next Post