लोकलमधून पडून डोंबिवलीतील ४९ वर्षीय इसमाचा मृत्यू

 


  •  सात दिवसात तिसरी घटना 
  • डोंबिवलीतील तिसरा बळी 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली स्टेशनवरून लोकल पकडून प्रवास करणे तिघा डोंबिवलीकरांच्या जीवावर बेतले असून हे तिन्ही अपघात डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडले आहेत. अवधेश दुबे, रिया राजगोर आणि राहुल अष्टेकर या तिघांना रेल्वे प्रवासादरम्यान आपले जीव गमवावा लागला. यातील दोन रेल्वे अपघाताची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात व तिसऱ्या अपघाताची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, २३ तारखेला डोंबिवली पश्चिमेकडील अवधेश दुबे याचा सकाळी डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासात तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला. २९ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील रिया राजगोरे या तरुणीचा कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला. डोंबिवली पश्चिमेकडील  श्रीधर म्हात्रे वाडी श्रीकृष्ण भवन बिल्डिंग येथील राहुल पुरुषोत्तम अष्टेकर ( ४९ ) यांचा शनिवार २७ तारखेला रात्री आठ वाजता  दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post