अलिबाग तालुक्यातील बेलोशी गाव आकर्षणाचे केंद्रबिंदू
अलिबाग, (धनंजय कवठेकर) : नदीच्या पात्रातील कठीण खडक आडवे किंवा क्षितिजसमांतर असले आणि त्यानंतरचे खडक मृदू असेल, तर नदीच्या पात्रातच एक कडा तयार होतो. कडा तयार होतो. या कड्यावरून नदी उडी घेते व धबधबा निर्माण होतो. अशा प्रकारच्या धबधब्यामध्ये नदीचे पाणी उंचावरून खाली पडल्याने धबधब्याच्या तळाशी पाण्याच्या आघातक्रियेमुळे विवर तयार होते. गेली २ ते३ वर्ष पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा अलिबाग तालुक्यातील बेलोशी गावच्या डोंगरावरचा कोंडी धबधबा दरवर्षी जुलै -ऑगस्ट महिन्यात सुरू होतो. शुभ्र पाणी अती उंचावरून वाहते.
निसर्गाच्या कुशीत दडलेला अलिबाग तालुक्यातील बेलोशी गावाच्या डोंगरावर कोंडी धबधबा ३/४ वर्षांपासून सुप्रसिद्ध झाला आहे. परंतु त्याचे श्रेय जाते, महेंद्र गावंड आणि कलातरंग टीमला बेलोशी हे निसर्गरम्य गाव आहे. पावसाळ्यापूर्वी कोंडीला अनेकांनी भेट दिली असेल परंतु कलातरंग महेंद्र गावंड यांनी तेथील निर्जीव लहान मोठ्या दगडांना पेंटींग करून सजीव सृष्टी निर्माण केली. त्यामुळे तेथील परिसराला ही शोभा आली आहे. आता तर निसर्गाच्या सानिध्यात राहून तेथील हुबेहूब दिसणारे वाघ, सिंह, कासव, पक्षी, मासे व जहाज यामुळे धबधब्याजवळ प्रसन्न वाटते. तसेच फोटोग्राफीसाठी तर वेगळाच अनुभव येत आहे. तरी सर्वांनी एकदा तरी पावसाळ्यात कोंडीला भेट द्यावी आणि तेथील कलातरंग महेंद्र गावंड यांनी केलेल्या पेंटींग व निसर्गाच्या कुशीत जाऊन पर्यटकांनी आनंद घ्यावा असे, कैलास कासकर आवर्जुन सांगतात.