स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे १० वी, १२ वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव


दिवा, (आरती मुळीक परब) : दिव्यातील बेडेकर नगर येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, तसेच स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सागीस वेलनेस व हर्ष ऑप्टिक हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


दिवा शहरातील शेवटचं टोक असणाऱ्या बेडेकर नगर येथे रविवारी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे सागीस वेलनेस व हर्ष ऑप्टिक हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरात डोळे तपासणी, हाडांच्या व्याधीसंदर्भातील तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा २०० ते ३०० नागरिकांनी लाभ घेतला. नंतर स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने १० वी १२ वी मध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या ४३ विद्यार्थ्यांचा त्यावेळी गुणगौरव समारंभ संपन्न झाला. या आरोग्य शिबिराचा आगासन फाटक, आगासन गाव, बेडेकर नगर, गणेश नगर, परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. तर आमच्या संस्थेचे हे चौथे वर्ष असून आम्ही सर्व सभासद दरवर्षी समाज उपयोगी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो, असे  स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप तरळ यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी विभागातील विकासक प्रतीक शशिकांत बेडेकर, माजी नगरसेवक दीपकदादा जाधव तसेच विभागप्रमुख शशिकांत पाटील, विवेक पाटील यांनी भेट दिली. 


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दिलीप तरळ, उपाध्यक्ष सोपान जाधव, कार्याध्यक्ष विनोद घाग, सचिव वैभव पवार, उप सचिव योगेश आमटे, खजिनदार योगेश बेंद्रे,  उप खजिनदार उमाजी शिर्के, हिशोब तपासनीस दत्तात्रय चव्हाण, सह हिशोब तपासनीस सतीश उदेग, सल्लागार प्रमोद भोवड, राजन सकपाळ, तानाजी पवार, दिनेश जाधव, महेश खडतड, धनाजी फके तसेच प्रतिष्ठानच्या सभासदांनी खूप मेहनत घेतली.




Post a Comment

Previous Post Next Post