अलिबाग, (धनंजय कवठेकर) : माजी समाजकल्याण सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगडचे उपाध्यक्ष दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळाने आयोजित केलेल्या विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ. दिलीप देशमुख हे आजच्या या शिबिरात मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या खेळकर शैलीत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन केले. त्यांच्या लालित्यपूर्ण आणि ज्ञानपूर्ण शैलीमुळे विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमात हरवून गेले होते.
या शिबिरासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश लेलेसाहेब, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदेश पालकर, अलिबाग तालुका युवा मोर्चा अध्यक्ष ॲड. निखील चव्हाण, भाजप तालुका सरचिटणीस शैलेश नाईक, भाजप कार्यकर्ते अमित म्हात्रे, झिराड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच महेश माने, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र म्हात्रे, किहीम ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश भोईर, आभाविपचे स्वयंसेवक यश म्हात्रे, श्रीतेज माळी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.