डोंबिवलीतील बस थांब्याची दुरवस्था



परिवहण व्यवस्थापनाचा कानाडोळा 

       डोंबिवली ( शंकर जाधव ) :  सामान्य नागरिकांना परवडणारा प्रवास म्हणजे बसमधील प्रवास या प्रवासाचा आनंद नागरिकांनी घ्यावा यासाठी बसथांबा बनविला जातो. मात्र केडीएमटी प्रशासनाकडून बसथांब्याच्या दुरदर्शेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच नागरिकांच्या सोयीसाठी असणारा बसथांबा त्रासदायक ठरत आहे. डोंबिवली पूर्वेकडील पेंढरकर कॉलेज समोरील डोंबिवली रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस नवीन बनविलेला केडीएमटीच्या बस स्टॉपची दुर्दशा झाली आहे.




   या बस थांब्यात बसविलेले स्टील बेंच गायब झाले आहे. बस स्टॉपचा आत बसविलेल्या लाद्याही तुटल्या फुटल्या आहेत. या बस स्टॉपचा वापर कॉलेज, शालेय विद्यार्थी आणि वरिष्ठ नागरिक करीत होते. आता ते सर्व पावसात उघड्यावर बसची वाट पाहत असतात. मिलापनगर बस स्टॉप मात्र लोकांची मागणी असूनही आणि पत्र देऊनही बांधला गेला नाही. इतरही ठिकाणी बांधलेले नवीन बस स्टॉपची दुर्दशा झाली आहे.हे बस स्टॉप आता पुन्हा बांधण्यात येणार आहेत का ? त्याची दुरुस्ती होणार आहे का ? चार महिन्यांतच या बस स्टॉपची दुर्दशा झाल्याने यात भ्रष्टाचार झाला असेल तर याची रीतसर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करायला हवी अशी मागणक जागरूक नागरील राजू नलावडे यांनी केली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post