रायगड जिल्हा न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

  


अलिबाग ( धनंजय कवठेकर) : पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये ५ जून २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

सदर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अध्यक्ष ए. एस. राजंदेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव अमोल शिंदे, जिल्हा न्यायाधीश - ३ ,एन. के. मणेर व अन्य न्यायिक अधिकारी तसेच एल. ए. डी. एस विभागातील चीफ ॲड. चंद्रशेखर कामथे, एल. ए. डी. एस व अन्य वकील वर्ग, अलिबाग तसेच वकील संघटनेचे सचिव ॲड. अमित देशमुख व वकील संघटनेचे सदस्य तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post