नर्सिंग असिस्टंटच्या माध्यमातून समाजसेवा शक्य- डॉ. नितीन गांधी

 


रायगड, (धनंजय कवठेकर) :  उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व जन शिक्षण संस्थान रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी उज्ज्वल भविष्य नानासाहेब कुंटे तांत्रिक विद्यालय वरसोली येथे "असिस्टंट नर्सिंग" या कोर्सचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. समाजातील गरीब व गरजू बेरोजगार युवक-युवतींना स्वतःच्या पायावर उभे राहून त्यांनी स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी संस्थे तर्फे पहिली बॅच मोफत शिकवण्यात येणार आहे. ही बॅच उज्ज्वल भविष्य नानासाहेब कुंटे तांत्रिक विद्यालय व जन शिक्षण संस्थान रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने चालवली जाणार असून विद्यार्थ्यांना कौशल भारत - कुशल भारत (Skill India) अंतर्गत केंद्र सरकार मान्यता प्राप्त कोर्स पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. या बॅचमध्ये २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला आहे. 

जन शिक्षण संस्थानचे संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली जे. एस. एस. रायगड हि संस्था मागील २० वर्षापासून सक्रीयपणे व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. तरी सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी सुरुवातीला सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व नंतर जे.एस.एस. चे चेअरमन डॉ. नितीन गांधी यांनी विद्यार्थ्यांना असिस्टंट नर्सिंग कोर्सचे महत्व सांगितले, तसेच तांत्रिक विद्यालय वरसोली अध्यक्ष उदय जोशी यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात मोलाचे मार्गदर्शन केले.



जे.एस.एस. चे डायरेक्टर डॉ. विजय कोकणे, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे अध्यक्षा मा. उज्ज्वला चंदनशिव ,डॉ. चिखलकर, डॉ. राजाराम हुलवान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व नंतर आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. या उद्घाटन कार्यक्रमाकरिता नानासाहेब कुंटे तांत्रिक विद्यालयाचे  सुरेंद्र जोशी, अविनाश राऊळ, उज्वल भविष्य सामाजिक संस्थेचे संचालक  रोशन पंडित, सदस्य मनीष पंचमुख , डॉ. स्वप्नील चिखलकर  जे. एस. एस. स्टाफवर्ग, समन्वयक कुमार ठाकूर,  पूजा लाडे व सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post