Sensex update : बुधवारी शेअर बाजाराची जोरदार उसंडी

 


मुंबई : मंगळवारी निवडणूक निकालाच्या दिवशी घसरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (बुधवारी ) शेअर बाजाराने जोरदार उसंडी मारली. बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स २३०० अंकांनी मजबूत झाला, तर दुसरीकडे निफ्टीनेही एकाच दिवसात २२५०० ची पातळी ओलांडली. बुधवारी सेन्सेक्स २,३०३.१९ (३.१९%) अंकांनी वाढून ८४,३८२.२४ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी ७३५.८५ (३.३६%) अंकांनी झेप घेऊन २२,६२०.३५ वर बंद झाला.

मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, ३० शेअर्सचा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सेन्सेक्स ४,३८९.७३ अंकांनी किंवा ५.७४ टक्क्यांनी घसरून ७२,०७९.०५ या दोन महिन्यांहून अधिक नीचांकी पातळीवर बंद झाला.  इंट्राडे ट्रेडमध्ये सेन्सेक्स ६,२३४.३५ अंकांनी किंवा ८.१५ टक्क्यांनी घसरून ७०,२३४.४३ या पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला.  राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १,९८२.४५ अंकांनी किंवा ८.५२ टक्क्यांनी घसरून २१,२८१.४५ अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.  व्यवहाराच्या शेवटी तो १,३७९.४० अंकांनी किंवा ५.९३ टक्क्यांनी घसरून २१,८८४.५० अंकांवर बंद झाला.  मात्र, भाजपला बहुमत मिळाले नसतानाही मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलेले पाहता, येत्या काही दिवसांत बाजार पुन्हा उचल घेईल असा अंदाज गुंतवणूकदारांनी वर्तवला होता.  

खालच्या पातळीवरील खरेदी वाढल्यामुळे बुधवारी मुंबई शेअर बाजारात तेजी दिसून आली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात ९४८.८३ अंकांनी झेप घेऊन ७३,०२७.८८ अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४७.१ अंकांच्या वाढीसह २२,१३१.६० अंकांवर पोहोचला. 

Post a Comment

Previous Post Next Post