विशाक कृष्णस्वामीचा २१.१ किलोमीटरचा दररोज सराव
डोंबिवली ( शंकर जाधव ) : प्रख्यात आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉनर विशाक कृष्णस्वामी, हा सलग ७०० दिवस केडीएमसी ग्राउंड, डोंबिवली येथे दररोज २१.१ किमी धावून आणखी एक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
याआधीच १०८ दिवसांचे सलग हाफ मॅरेथॉनचे प्रभावी अंतर, एकूण २२७८ kms कव्हर करून, विशाकने भारताचे आणि त्याच्या मूळ गावी, डोंबिवलीचे अभिमानाने प्रतिनिधित्व करत, त्याचा दुसरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे. विशाक म्हणतो कि, "मी सलग ७०० दिवसांच्या या आव्हानासाठी वचनबद्ध आहे आणि पोषण, आहार आणि इतर आवश्यक खर्चांसह या सहनशक्तीच्या धावांना पाठिंबा देण्यासाठी प्रायोजकत्व शोधत आहे. प्रायोजकत्वाच्या संधी आणि अधिक माहितीसाठी, कृपया विशाक कृष्णस्वामी ७०४५५१८९२२ वर संपर्क साधावा.