सिंधुदुर्ग : राज्यात काही विभागात ढगाळ वातावरण झाले असताना कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळसह अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे.
या पावसामुळे नागरिकांची उष्णतेपासून काहीकाळ सुटका होणार आहे. हवामान विभागाकडून कोकणला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या लगत राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.