डोंबिवली स्टेशनबाहेरील जुने फिश मार्केट जमीनदोस्त

 


 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीमधील सर्वात जुने फिश मार्केट मंगळवारी २३ तारखेला पालिका प्रशासनाने जेसीबीच्या सहायाने जमीनदोस्त करण्यात आले.या कारवाईवेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येथील मच्छीविक्रेत्यांना ताटापूर्त्या स्वरूपात बाजूकडील जागेत जागा देण्यात आली आहे. नवीन फिश मार्केटचे काम पूर्ण होईपर्यत येथील मच्छिविक्रेत्यांना तातपुत्या जागेवर मच्छी विकण्याची परवानगी देण्यात आली आहे.




याबाबत माहिती देताना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले, डोंबिवलीतील सर्वात जुने फिश मार्केट पालिका प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आले. या जागेवरच अत्यंत सुज्जज आणि अत्याधुनिक असे फिश मार्केट उभारले जाणार आहे.हे नवीन फिश मार्केटचे काम लवकरच पूर्ण होईल.





Post a Comment

Previous Post Next Post