मुंबई ( नारायण सावंत ज्येष्ठ पत्रकार) : नुकत्याच गोवा येथेपार पडलेल्या इंडिया ओपन कंपेटिशन (रायफल /पिस्तूल) प्रकारात विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील नेमबाज श्रिया रवींद्र गोळे हिने १० मीटर पीप साइट रायफल नेमबाजी प्रकारात कास्य पदक पटकाविले आहे. श्रिया राष्ट्रीय नेमबाज असून तिला अजून परिश्रम करून भारताचे आंतर राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करायचे आहे.
तर बंगलोर येथे पार पडलेल्या (सी.आय.एस.सी.ई) नॅशनल शूटिंग टूर्नामेंटमध्ये श्लोक सतीश हजारे याने १० मीटर एअर रायफल प्रकारात १७ वर्षाखालील वयोगटात सुवर्ण पदक जिंकून स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया शूटिंग कंपेटिशनमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. देशासाठी आंतर राष्ट्रीय पातळीवर स्वतः प्रतिनिधीत्व करण्याची श्लोक यांची इच्छा आहे.
दोन्ही खेळाडूं नेमबाज प्रशिक्षक स्नेहल पापळकर कदम यांच्याकडून नेमबाजी चे प्रशिक्षण घेत आहेत. प्रबोधनकार ठाकरे संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, संस्थेचे सचिव डॉ. मोहन राणे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.