मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
समितीत अभियंते, आयआयटी तज्ज्ञ आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार
मुंबई: ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत सोमवारी कोसळलेल्या ३५ फुटांच्या पुतळ्याच्या कंत्राटदाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे, ज्यात पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे आणि पुतळ्यासाठी वापरण्यात आलेले नट आणि बोल्ट गंजलेले असल्याचे आढळले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात नाव असलेल्या एका स्ट्रक्चरल इंजिनीअरने आपण या प्रकल्पासाठी स्ट्रक्चरल सल्लागार नसल्याचा दावा केला आहे.
बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थनी वरिष्ठ मंत्री, अधिकारी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तसेच याच ठिकाणी एक नवीन पुतळा उभारण्याच्या दृष्टीने तांत्रिक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे या समितीत केली आहे. या समितीत अभियंते, आयआयटी तज्ज्ञ आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
याप्रसंगी कलाकार जयदीप आपटे यांच्यासह एफआयआरमध्ये नाव असलेल्या चेतन पाटील यांनी म्हटले आहे की, आपण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (पीडब्ल्यूडी) प्लॅटफॉर्मचे डिझाइन भारतीय नौदलाला सादर केले होते, परंतु त्याचा काहीही संबंध नाही. ठाण्यातील एका कंपनीने पुतळ्याशी संबंधित इतर कामे केल्याचे सांगत ज्या व्यासपीठावर पुतळा उभारला जात होता, त्याच व्यासपीठावर मला काम करण्याचे मला सांगण्यात आले असल्याचे पाटील यांनी म्हटले.
विरोधी MVA ने शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी सरकारवर निशाणा साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे बुधवारी मालवणला गेले होते त्यावेळी देखील राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक यांच्यात वादविवाद झाले.