माजी पोलीस महासंचालकांसह इतर ६ जणांविरुद्ध तक्रार दाखल




मुंबई: महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) संजय पांडे आणि इतर ६ जणांविरुद्ध ठाणे शहरात खंडणी, गुन्हेगारी धमकी आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. याबाबत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही दुजोरा दिला आहे. या प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


 मुंबईचे व्यापारी संजय पुनमिया यांनी तक्रार दिल्यानंतर सोमवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात पांडेसह सात जणांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला.  तक्रारीत, पुनमियाने मे २०२१ ते ३० जून २०२४ दरम्यान आरोपींनी बेकायदेशीरपणे खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडून पैसे उकळले. त्याचबरोबर न्यायालयाची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे बनवली असल्याची देखील तक्रार केली आहे. तसेच २०१६ मधील एका गुन्ह्याचा त्यांनी बेकायदेशीर तपास केल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.

 

 निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याशिवाय, एफआयआरमध्ये माजी एसीपी सरदार पाटील, निरीक्षक मनोहर पाटील, अधिवक्ता शेखर जगताप, बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवा आणि इतर दोन - सुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांच्या नावाचा देखील समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post