नागरी संरक्षण प्रशिक्षण वर्गाचे सोनारपाडा विभागात आयोजन

 

   


 डोंबिवली : डोंबिवली परिसरात वारंवार होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता MIDC विभागालगत असलेल्या सोनारपाडा येथील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे ५ दिवसीय प्राथमिक प्रशिक्षण शासनाच्या माध्यमातून नागरी संरक्षण संघटनेद्वारे देण्यात आले.  या प्रशिक्षण वर्गात मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

 या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समारंभास नगरसेवक  महेश पाटील  आणि नागरी संरक्षण संघटनेचे उपनियंत्रक विजय जाधव तसेच नागरी संरक्षण संघटनेचे उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी यांनी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले.  याप्रसंगी बोलताना सन्माननीय नगरसेवक महेश पाटील यांनी संघटनेचे स्वयंसेवक व अधिकारी वर्ग आपत्ती काळात करत असलेल्या कामाचे कौतुक केले. आपण स्वतः अनेक दुर्घटनेत नागरी संरक्षण स्वयंसेवकांना उत्स्फूर्तपणे दुर्घटना निवारण कार्य करताना पहिले असून त्यांचे कार्य खरोखर वाखाणण्याजोगे असून जास्तीत जास्त नागरिकांनी या संघटनेचे प्रशिक्षण घेतले पाहिजे असे प्रतिपादन केले. 

      या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात विद्या गडाख ( विभागीय क्षेत्ररक्षक- कोपरी ठाणे) यांनी पुढाकार घेऊन नागरिकांचे प्रबोधन करून प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यासाठी वास्तु उपलब्ध करण्यात  मोलाची कामगिरी केली. सहाय्यक उपनियंत्रक आननसिंग गढरी यांनी सदर पाठ्यक्रमास पाचही दिवस उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन संदर्भात विविध विषयांवर अतिशय प्रभावी प्रशिक्षण दिले. 





Post a Comment

Previous Post Next Post