डोंबिवली ( शंकर जाधव ) : महिलांची सुरक्षा आणि रेल्वे प्रवासात वाढलेले गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन प्रवाशांसाठी कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत दोन पोलीस मदत केंद्रांचा शुभारंभ रविवारी सकाळी ८ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे उपस्थित होते. यांनी त्याबाबत सांगितले की, लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेने मदत केंद्र उभारण्यात आली आहेत असे उंदरे म्हणाले. ठाकुर्ली व कोपर दोन्ही स्थानकात पश्चिमेला ते मदत केंद्र ठेवण्यात आले असून अहोरात्र पोलीस त्या स्थानकात कार्यरत असतात, त्यांना ऑनड्युटी असताना त्या मदत केंद्राचा लाभ।होईल. तसेच एखादी घटना घडल्यास प्रवाशांना पोलिस सहकार्य हवे असल्यास कुठे जावे याबाबत त्या कक्षातले पोलीस सहकार्य करतील असेही सांगण्यात आले. यावेळी उपस्थित महिला पोलिसांनी मंत्री चव्हाण यांचे आभार मानले.