मुंबई: मुंबईचा युवा क्रिकेटर मुशीर खानच्या एसयूव्हीला शुक्रवारी रात्री आझमगडहून लखनऊला जात असताना अपघात झाला, त्यामुळे त्याच्या मानेला, हाताला आणि पायाला दुखापत झाली. १९ वर्षीय मुशीरवर सध्या लखनऊच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताच्या वेळी मुशीरचे वडील आणि प्रशिक्षक नौशान खानही कारमध्ये उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. या अपघातात नौशान खानलाही किरकोळ दुखापत झाली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) एका सूत्राने माहिती दिली आहे की, वेगामुळे कारचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर अनेक वेळा उलटली. त्याला मान फ्रॅक्चर आहे की नाही आणि तो किती गंभीर आहे याची पुष्टी करण्यासाठी डॉक्टर त्याच्या स्कॅन रिपोर्टची वाट पाहत आहेत. एमसीएक्स माहितीनुसार मुशीर खान घरेलू क्रिकेटमधून बाहेर आहे. या अपघातात मानेला आणि शरीरावर जखमा झाल्या आहेत. मुशीर खानला तीन महिने आराम करावा लागणार आहे तसेच सहा ते सात महिन्यानंतर तो खेळण्यासाठी सज्ज होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सरफराज खान भाऊ मुशीर खान आपल्या वडिलांकडून आजमगढमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. १ ऑक्टोबर रोजी अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर शेष भारत आणि मुंबई यांच्यात ईरानी चषक स्पर्धेतील सामना होणार होता. मात्र या अपघातामुळे तो सहा-सात महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे यामुळे मुशीर खानचे चाहते नाराज झाले आहेत.