KDMC news : नागरिकांनी मानले आयुक्तांचे आभार

 



डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : फेरीवाला मुक्त स्टेशनपरिसर करण्याठीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कंबर कसली आहे. फूटपाथ, रस्तावर अतिक्रमण करून नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याकरता पालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण हटाव विभागाकडून सातत्याने कारवाई सुरू आहे.




पूर्वेकडील स्टेशनपरिसरात अनधिकृतपणे बसलेल्या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी गुरुवारी व शुक्रवारी केलेल्या कारवाईत गँस सिलेंडर, बाकडे, समान जप्त करण्यात आले.पालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार 'फ' प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त भरत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. कारवाई सातत्य पाहून नागरिकांनी पालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांचे आभार मानले.




Post a Comment

Previous Post Next Post