KDMC Corporation: स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासूनच, शाळेपासूनच करा




उपायुक्त अतुल पाटील यांचे आवाहन 

कल्याण (शंकर जाधव) : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वच्छता ही सेवा" या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणीय चित्रपट महोत्सव २०२४ चे आयोजन बुधवारी सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे  करण्यात आले होते यावेळी बोलतांना, स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासूनच, आपल्या शाळेपासूनच करा,असे आवाहन उपआयुक्त अतुल पाटील यांनी केले. यावेळी पर्यावरण दक्षता मंडळाचे सचिव संजय जोशी,  कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे,सहा.आयुक्त प्रिती गाडे स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, उपअभियंता मुराई तसेच पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले आणि इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.


या कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेची शपथ घेवून करण्यात आली व तद्नंतर उपस्थित शालेय विद्यार्थ्यांसाठी जैवविविधतेचे विहंगम दर्शन घडविणा-या धामापूर तलाव, टिटवाळा येथील देवराई अशा अतिशय  प्रबोधनपर,जनजागृतीपर लघुचित्रफिती (माहितीपट) दाखविण्यात आल्या.





शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण‍ उपक्रम राबविल्याबाबत पर्यावरण दक्षता मंडळाचे सचिव संजय जोशी यांनी महापालिकेचे विशेषत: घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कौतुक केले. घरगुती घातक कचरा,सॅनिटरी कचरा,प्लास्टिक कचरा,सुका कचरा,ओला कचरा प्रत्यक्षात कसा वेगळा करायचा,वेगळा करणे का आवश्यक आहे याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी विद्यर्थ्यांशी  प्रत्यक्ष संवाद साधत ,कचरा विलगीकरणाबाबत विद्यर्थ्यांना मार्मिक प्रश्न विचारत विद्यार्थ्याची जिज्ञासा जागृत केली आणि यावेळी अचुक उत्तरे देण्या-या विद्यर्थ्यांना पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. डोंबिवली परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी  या कार्यक्रमास प्रचंड संख्येने उपस्थित राहून भरघोस प्रतिसादर दिला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्तात्रय लदवा यांनी केले.




Post a Comment

Previous Post Next Post