KDMC Corporation: मालमत्ता कराची माहिती मिळणे झाले सोपे





मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध 

कल्याण, ( शंकर जाधव) : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका हददीतील मिळकतधारकांना त्यांचा मोबाईल क्रमांक (Mobile No) व ई-मेल आयडी (e-mail) हा मालमत्ता क्रमांकाशी लिंक करणेची सुविधा महापालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालमत्ता कर वेळेत भरण्याबाबत मिळकतधारकांना मोबाईल क्रमांकावर SMS पाठविण्यात येतात.

तथापी, बहुतांश मालमत्ताधारकांनी त्यांचा (Mobile No) व ई-मेल आयडी (e-mail) हा मालमता क्रमांकाशी नोंदणी (Link) न केल्यामुळे वा चुकीच्या मोबाईल क्रमांक नोंदणी (Link) केल्यामुळे त्यांना कर संकलन विभागाकडून पाठविलेले SMS प्राप्त होत नाहीत. त्यामुळे, अशा मिळकतधारकांना नाहक दंड व जप्तीच्या कारवाईस सामोरे जावे लागते.

मालमत्ता क्रमांकावर योग्य मोबाईल क्रमांक (Mobile No) व ई-मेल आयडी (e-mail) नोंदणी (Link) असल्यास कर विभागाकडून पाठविण्यात येणारी माहिती संबंधित मिळकतधारकास वेळेवर मिळेल व दंड/जप्तीसारखी कारवाईचे प्रसंग उदभवणार नाही.

वरील सुविधा नागरीकांच्या सहकार्य व सहभागावर अवलंबून असल्याने, मिळकतधारकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक (Mobile No) व ई-मेल आयडी (e-mail) आपल्या मालमत्ता क्रमांकाशी नोंदणी (Link) करावा तसेच चुकीचा मोबाईल क्रमांक नोंदणी (Link) केलेला असेल तो अद्ययावत (Update) करावा असे आवाहन कर निर्धारण व संकलन विभागामार्फत करण्यात येत आहे.


असा करा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अपडेट.

महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर ---> "Citizen KYC Form"---> मालमत्ता क्रमांक --> ई-मेल आयडी---> विद्युत बिल युनिट क्रमांक---> विद्युत मिटर क्रमांक ---> विद्युत ग्राहक क्रमांक ---> भूमिगत ड्रेनेज कनेक्शन उपलब्ध होय/नाही---> भूमिगत सेप्टिक टाकी उपलब्ध होय/नाही आदी माहिती भरावी. मालमता कर व विद्युत बिल अपलोड करावे.

Post a Comment

Previous Post Next Post