Kdmc news : किल्ले दुर्गाडी लगतच्या रस्त्यामधील बांधकामे जमीनदोस्त



कल्याण, ( शंकर जाधव) : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी लगतच्या डीपी रस्त्याचे काम महापालिकेमार्फत प्रस्तावित आहे. या रस्ता रुंदीकरणामधील एकूण २५ बाधित बांधकामांपैकी शनिवारी १५ बाधित बांधकामांवर महापालिकेमार्फत निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. उर्वरित बाधित बांधकामावर तोडक कारवाई सुरू अजूनही आहे. यावेळी तेथील तबेल्यातील सुमारे २५० म्हशी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या.



या कारवाईदरम्यान महापालिकेचे परिमंडळ १चे उपायुक्त प्रसाद बोरकर,क प्रभागाचे सहा आयुक्त तुषार सोनवणे, ब प्रभागाच्या सहा आयुक्त सोनम देशमुख, ड प्रभागाच्या सहा आयुक्त सविता हिले, क प्रभागातील अतिक्रमण नियंत्रण विभागाकडे कर्मचारी त्याचप्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इतर पोलीस कर्मचारी महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सदर कारवाई चार जेसीबी व एक पोकलेन च्या सहाय्याने करण्यात येत आहे. 







Post a Comment

Previous Post Next Post