डोंबिवली ( शंकर जाधव ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीचे नियमित सदस्य आणि सुनिल नगरमधील न्यू स्नेह श्रद्धा सोसायटीचे रहिवासी रामचंद्र तुपे साहेब व त्यांचे कुटुंबीय लवकरच डोंबिवलीतील सुप्रसिद्ध ‘रिजन्सी अनंतम’ संकुलात स्थलांतरित होत आहेत. त्यांच्या या नवीन प्रवासाच्या निमित्ताने, व्यायाम समितीच्या वतीने गुरुवार, २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता उद्यानात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
समारंभात व्यायाम समितीच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. तुपे साहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांना, समितीचे ज्येष्ठ सदस्य आणि योग प्रशिक्षक रघुनाथ राणे यांच्या शुभहस्ते, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व आशीर्वाद प्रदान करण्यात आले. सदस्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुणांवर प्रकाश टाकत, आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रामचंद्र तुपे यांनी समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानत प्रत्येकाला आठवणीस्वरूप भेटवस्तू दिली.कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबानदारी माजी नगरसेवक श प्रकाश शांताराम माने यांनी सांभाळली.
या सोहळ्याला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप सुधाकर पवार, उद्योगपती विक्रम बाळकृष्ण म्हात्रे, मंडप डेकोरेटर प्रदीप गोमन केणे, बिल्डर व डेव्हलपर विकास म्हात्रे, प्रीती नेमाडे, ममता तिवारी, लता पाटील, सुरेखा भोगले, सुनिता पवार, सुष्मिता शर्मा, माधुरी कोरडे, गीता निवळकर, स्नेहा भोसले, गीता नाईक, रामकृष्ण नारखेडे काका व काकू, विलास सावंत, चावडा साहेब, नांदिवली येथील उद्योजक संजय म्हात्रे, राजन जोशी, केशव करकेरा, सदाशिव (राजा) लोहार तसेच २५-३० ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित महिला व पुरुष सदस्यांनी आपुलकीपूर्ण वातावरणात कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रमाची सांगता सर्वांच्या मनोगतांनी आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाली.