दुसरा मुलगा जखमी, टेम्पोचालकास अटक
डोंबिवली ( शंकर जाधव ) : भरधाव वेगाने धावत असलेल्या टेम्पोच्या धडकेत एका १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मुलगा जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील कावेरी चौकात घडली. या प्रकरणी टेम्पोचालकाला मानपाडा पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धशल खंदारे (१४) असे यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव असून तो सोनारपाडा ययेथे राहत होता. तर वैभव शेंडगे असे जखमी मुलाचे नाव आहे. जखमी वैभवला उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कावेरी चौकात घडलेल्या घटनेत टेम्पोचालकाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवली एआयडीसी निवासी कावेरी चौकात टेम्पोने दुचाकीवरील दोन मुलांना उडविले. टेम्पोचालक दारूच्या नशेत असल्याचे बोलले जात आहे. एक मुलगा मयत झाला असून दुसरा मुलगा जखमी झाला असून त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पोचालकाने दारू पिऊन गाडी चालवली का याचा तपास पोलीस करत आहेत.