अलिबाग पत्रकार, कुटुंबांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

 



जिल्हा सामान्य रुग्णालय आणि अलिबाग प्रेस असोसिएशनचा उपक्रम 

अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : पत्रकार हे नेहमीच सामाजिक प्रश्नावर आपला दृष्टिक्षेप टाकून समस्या सोडविण्याचा महत्वाचा वाटा उचलत असतात. पत्रकार यांचे जीवन धावपळीचे असल्याने अनेक आरोग्याच्या समस्या त्यांनाही उद्भवत असतात. पत्रकारांच्या आरोग्य ही उत्तम रहावे यासाठी अलिबाग प्रेस असोसिएशन च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त माध्यमातून पत्रकार आणि कुटुंबाची आरोग्य तपासणी आणि आभा कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३५ हुन अधिक पत्रकार आणि कुटुंबाची आरोग्य तपासणी आणि आभा कार्ड नोंदणी करण्यात आली. 

अलिबाग पंचायत समिती येथील अलिबाग प्रेस असोसिएशन कार्यालयात मंगळवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल घुगे जोशी, ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, अलिबाग प्रेस असोसिएशन चे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, सदस्य आणि कुटुंबीय, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका उपस्थित होते.




पत्रकार हे सतत विविध प्रश्न आपल्या वृत्तपत्रात मांडून त्यावर प्रकाश टाकत असतात. त्यामुळे शासन, प्रशासन स्तरावर त्याची दखल घेऊन प्रश्न सोडविले जातात. पत्रकार हा उन, वारा, पाऊस या काळात आपले पत्रकारितेचे काम करीत असतो. अशावेळी त्याच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असतो. शासनाने सर्वांना पाच लाख पर्यंत मोफत उपचार रुग्णालयात देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आभा आणि आयुष्यमान कार्ड काढणे आवश्यक आहे. त्यामुळे पत्रकारांनाही याचा लाभ होणार आहे. आरोग्य तपासणी आणि आभा कार्ड नोंदणी शिबिरातून याचा लाभ पत्रकार आणि कुटुंब यांना होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील प्रत्येकाने आभा आणि आयुष्यमान कार्ड काढण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांनी केले आहे. 


आरोग्य तपासणी शिबिरात पत्रकार आणि कुटुंबाची बीपी, शुगर, रक्त तपासणी करण्यात आली. ३५ हुन अधिक पत्रकार आणि कुटुंब यांची तपासणी करण्यात आली. आभा आणि आयुष्यमान कार्ड नोंदणी ही यावेळी करण्यात आली. वैभव नाईक आभा ऑपरेटर,

पूजा पवार, परिचारिका, डॉ. रुपाली घुगे, डॉ. वैभव पाटील, हृतिका प्रधान, निलेश भंडे लॅब असिस्टंट, जयेश इदाते, अधीपरीचारक, आयुषा पटेल फॅसिलिटी व्यवस्थापक यांनी आरोग्य तपासणी आणि कार्ड नोंदणी केली. महेश पोरे यांनी सूत्र संचलन केले.


मिलिंद अष्टीवकर यांचा सत्कार

रायगड जिल्ह्यातील रोह्याचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांचे मराठी पत्रकार परिषदेवर नुकतीच अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. याबाबत अलिबाग प्रेस असोसिएशन तर्फे मिलिंद अष्टीवकर यांचा सन्मान करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या हस्ते मिलिंद अष्टीवकर यांना शाल, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.




Post a Comment

Previous Post Next Post