दिव्यात गरजूंना उमेश भगत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून २३ रिक्षांचे वाटप

 



दिवा (आरती परब) : दिव्यात कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि उमेश भगत सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून २३ रिक्षा गरजूंना वाटप करण्यात आल्या.

दिव्यात प्रत्येक वेळी मदतीला धावून जाणारे असा लौकिक असणारे उमेश भगत. यांच्या सेवाभावी संस्थेमधून आज हे गरजू महिला व नागरिकांना रिक्षा वाटप आहे. माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनिता मोदक, संस्थापक अध्यक्ष, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माजी नगरसेविका दिपाली उमेश भगत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रिक्षांच्या चाव्या देण्यात आल्या.

या रिक्षांसाठी २१ दिवसाचे ट्रेनिंग महीलांना आणि ७ दिवसाचे ट्रेनिंग पुरुषांना संस्थेकडून मोफत देण्यात आले. त्यावेळी लर्निग लायसन्स, रिक्षा चालवण्याचे ट्रेनिंग, पर्मनंट लायसन्स, बॅच ,बिल्ला, परमिट, रिक्षाचे लोन, रिक्षाचे वुड लाऊन, रिक्षा चार डी.डी., रिक्षाची पासिंग, रिक्षाची नंबर प्लेट, ऑईल विरहीत ६ सरव्हीसींग मोफत आहेत. या सर्व गोष्टी दोन्ही संस्था मार्फत देण्यात आल्या. या सर्व रिक्षा कळव्यामधील TVs च्या शोरुम मधून देण्यात आल्या आहेत. 

त्यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी शैलेश मनोहर पाटील, अमर पाटील, दिपक जाधव, माजी नगरसेविका सौ. दिपाली उमेश भगत, सौ. दर्शना चरण म्हात्रे, उपशहर प्रमुख आदेश भगत, विभाग प्रमुख उमेश भगत, गुरुनाथ पाटील, भालचंद्र भगत, निलेश पाटील, शशिकांत पाटील, राजेश पाटील, सचिन चौबे, चरणदास म्हात्रे, सुभाष गजरे, प्रदिप जैस्वाल, सुर्यकांत कदम, भरत शिंत्रे तसेच इतरही पदाधिकारी, कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते. तेव्हा कल्याणी बहुउद्देशिय संस्थेच्या सुनिता 
मोडक, श्रेया तटकरे, वृषाली कालणं हे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post