अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय,भारत सरकार रायगड- अलिबाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता ही सेवा २०२४ स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या अभियानाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, अलिबाग या ठिकाणी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वय निशांत रौतेला व जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनुर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनुर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा पिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी सहभागी झाल्या होत्या. तसेच स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा तसेच प्रिझम संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ही मोहीम यशस्वी होण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.