डोंबिवली पश्चिमेकडील गावदेवी सेवा मित्र मंडळाचा नवरात्रौत्सव उत्साहात

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पश्चिमेकडील रेतीबंदर रोडवर गावदेवी  सेवा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा होत आहे.  संस्थापक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, कार्याध्यक्ष पमेश म्हात्रे, सल्लागार नंदकुमार बेळके यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते अथक मेहनत घेतात. देवीच्या मूर्तीचे आगमन होत असताना परिसरातील नागरिक सहभागी झाले. 

नऊ दिवस देवींची आरती करण्यासाठी विविध संस्था, समाजसेवक, पोलीस, पत्रकार,विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गा यांना मान दिला जातो. या ठिकाणी गरबा आणि दांडिया  खेळण्याकरता आयोजन केले जाते.शिस्त आणि शांततेत खेळल्या जाणाऱ्या गरबा व दांडियाचे परिसरातील नागरिक व पोलीस कौतुक करतात. वाहतूक व्यवस्था कोणतही अडचण होत नसल्याने वाहतूक पोलीसही मंडळाचे कौतुक करतात. यां मंडळाला अनेक राजकीय नेतेमंडळी उपस्थित होत देवीचे दर्शन घेतात.

Post a Comment

Previous Post Next Post