Maharashtra assembly elections 2014 : शक्तिप्रदर्शन करत संजय केळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल



ठाणे, ( रिना सावर्डेकर) : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार संजय केळकर यांनी आईचे आशिर्वाद घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरला. सोमवारी दिपावलीच्या वसुबारसच्या शुभदिनी केळकर यांनी घंटाळी देवी मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतले. 

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय केळकर यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारालाही सुरुवात केली असून, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताप्रमाणे विकसित ठाणे साकारण्यासाठी तिसऱ्यांदा ठाणेकरांचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने जनता पुन्हा एकदा मला निवडून देईल, असा विश्वास यावेळी आ. संजय केळकर यांनी व्यक्त केला.

 सकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आ. निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, ठाणे शहर विधानसभा प्रमुख सुभाष काळे, मा. नगरसेवक नारायण पवार, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, संदीप लेले, परिवहन सदस्य विकास पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, सचिन पाटील, महेश कदम, डॉ. राजेश मढवी आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो हितचिंतक, नागरीक उपस्थित होते.


संजय केळकर हॅटट्रीक करतील - देवेंद्र फडणवीस

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे उमेदवार संजय केळकर हे ठाण्याचा सुसंस्कृत चेहरा आहेत. त्यामुळे या निवडणुकीत केळकर तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅटट्रीक करतील, असा ठाम विश्वास भाजपचे शिर्षस्थ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post