Maharashtra assembly elections 2024 : ठाणे बालेकिल्ला कायम राखण्यासाठी आ.संजय केळकर सज्ज



ठाण्यात महायुतीचा जल्लोष

ठाणे : रविवारी भाजपच्या पहिल्या यादीत आ. संजय केळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ठाणे गडात हॅटट्रीक करण्यासाठी आ.संजय केळकर सज्ज झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. पुन्हा ठाण्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने आ. केळकर यांनी शक्तीस्थळावर नतमस्तक होऊन धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन केले.


ठाणे विधानसभेवर हॅटट्रीक करण्यासाठी आमदार संजय केळकर सज्ज झाले आहेत. रविवारी भाजपच्या पहिल्या यादीत आ. संजय केळकर यांची वर्णी लागताच गेल्या अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या वावड्यांना अखेर पुर्णविराम मिळाला. आ. केळकर यांची उमेदवारी जाहिर होताच महायुतीतर्फे भाजपच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात ढोल - ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. 




  ठाणे शहर विधानसभा मतदार संघ बहुभाषिक असला तरी आ. संजय केळकर हे स्वच्छ प्रतिमेचे सर्वसमावेशक नेतृत्व असल्याने २०१४ आणि २०१९ साली भाजपच्या तिकिटावर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आता २०२४ च्या निवडणुकीसाठीही पक्षाने पुन्हा एकदा आ. केळकर यांच्यावरच विश्वास दर्शविल्याने या खेपेला आ. केळकर हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. याप्रसंगी, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघूले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक सुनेश जोशी, हाऊसिग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील,भाजप ठाणे शहर महिला अध्यक्षा स्नेहा पाटील, उपाध्यक्ष महेश कदम, सरचिटणीस विलास साठे, सचिन पाटील, भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 लोकसभेप्रमाणे ठाण्याचा गड महायुतीच जिंकेल - आ. केळकर

   केंद्रात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाचे पर्व सुरू आहे. केंद्रात व राज्यात असलेल्या डबल इंजिन सरकारमुळे हे शक्य झाले. तेव्हा अभिनव भारत तसेच विकसित ठाणे घडवायचे असेल तर महायुती शिवाय पर्याय नाही. ठाण्याची जनता सुज्ञ आहे, सर्वपक्षियांसह ठाणेकरांचे असंख्य हात माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे विजयाची चिंता वाटत नाही, लोकसभे प्रमाणेच ठाण्याचा हा गड महायुतीच जिंकेल.असा विश्वास व्यक्त करून आ. संजय केळकर यांनी, पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व केंद्रीय नेत्यांचे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीचे आभार मानले आहेत.






Post a Comment

Previous Post Next Post