माजी आमदार सुभाष साबणे यांचा 'परिवर्तन महाशक्ती' पक्षात प्रवेश

 


कोल्हापूर, ( शेखर घोंगडे) : माजी आमदार सुभाष साबणे यांचा परिवर्तन महाशक्तीमध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. 

शिवसेना पक्षाकडून १९९९, २००४ व २०१४ साली आमदार म्हणून साबणे निवडून आले होते, तसेच देगलूर बिलोलीचे विधानसभेचे कॉंग्रेस आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या अकाली निधनानंतर साबणे यांनी भाजपा पक्षातर्फे पोट निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता.

सुभाष साबणे यांनी काल भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर परिवर्तन महाशक्तीमध्ये प्रवेश केला आहे.




Post a Comment

Previous Post Next Post