Kolhapur : कोल्हापूर बसस्थानकात अभ्यंगस्नान, फराळाचे वाटप

 


कोल्हापूर, ( शेखर धोंगडे) : बसस्थानकात दीपावलीनिमित्ताने प्रवासी व कर्मचारी यांना फराळ म्हणून लाडू वाटप करण्यात आले. यावेळी १३५ कर्मचाऱ्यांनी अभ्यंगस्नानाचा लाभ घेतला. या सर्व येथील व बाहेरील मुक्कामी चालक वाहक कर्मचाऱ्यांना साबण, उटणे, तेल व फराळ देण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक  अनिल म्हेत्तर, प्रमोद तेलवेकर, स्थानकप्रमुख मल्लेश विभुते, कार्यशाळा प्रमुख संकेत जोशी,स. वा. नि. दिपक घारगे,शेखर सुर्वे, वाहतूक नियंत्रक उत्तम पाटील, इफ्राण सांगावकर, दीपक सणगरे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक वाहतूक निरीक्षक दीपक घारगे, प्रकाश बावणे, निळकंठ कळंत्रे, इफ्राण सांगावकर व उत्तम शिवराम पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.

 दीपावलीनिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल बाहेरील विभाग व बाहेरील आगारातील मुक्कामी चालक / वाहक यांनी मनापासून आभार मानले, घरीच असल्याची भावना त्यानी व्यक्त केल्या.  अभ्यंगस्नान व फराळाची व्यवस्था कोल्हापूर आगार प्रशासनातर्फे सालाबाद प्रमाणे यंदाही जपली.




Post a Comment

Previous Post Next Post