प्रवक्ते संतोष पाटील यांची मागणी
कोल्हापूर, ( शेखर धोंगडे) : सांगली विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाने ज्या उमेदवाराला दिली आहे तो उमेदवार बदलून काँग्रेस पक्षाने जयश्री मदन पाटील यांना पाठिंबा द्यावा. कारण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची हॅटट्रिक रोखण्याचे काम जयश्री पाटील याच करू शकतात असा दावा संतोष पाटील यांनी केला आहे.
सांगलीत झालेल्या सर्व्हेनुसार माहिती जयश्री पाटील यांना लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवारी बदलून त्या ठिकाणी जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा द्यावा. विधानसभेत जनतेचा पाठींबा असणारा नेता पाठविणे हे गरजेचे असून सांगलीतील जनाधार जयश्री पाटील यांच्या पाठिमागे असल्याचे सर्वेक्षणावरून दिसून येत आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षाने व वरिष्ठ नेत्याने पाठिंबा द्यावा, अन्यथा या ठिकाणी लोकसभेप्रमाणे सांगली पॅटर्नचा उदय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.