रश्मी परब यांचा इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद
डोंबिवली ( शंकर जाधव ) : मुंबई मधील परेल व्हिलेज येथे राहणारी रश्मी परब या महिलेने अनेक साहसी छंद जोपासले आहेत. गड किल्ले, उंच शिखर/पर्वत चढून जाणे, मोटारसायकलने भ्रमंती करणे, विविध देवस्थान यांना मोटारसायकल/चालत भेटी देणे, फोटोग्राफी करणे इत्यादी छंद ती आवडीने जोपासत असते.
७ डिसेंबर २०२४ रोजी तिने महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंग मोटारसायकल वरुन जावून कमीतकमी वेळेत दर्शन घ्यायचे असा निश्चय केला. त्यासाठी तिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस याना कळविले होते. दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी भल्या पहाटे साडेचार वाजता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमाशंकर मंदिरात दर्शन घेवून या मोहिमेला सुरुवात केली. यानंतर औरंगाबाद वेरूळ येथील घ्रूष्णेश्वर मंदिर याचे दर्शन घेवून शेवटी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेवून ही मोहीम पूर्ण केली.
एक दिवसातच ११ तास १५ मिनिट ( ८ तास ५२ मिनिट या फिरत्या वेळेसह ) मध्ये हा तीन ज्योतिर्लिंग मंदीर संपूर्ण ४७०.७२ किलोमीटर प्रवास रॉयल एनफिल्ड ( STD 350 BS4 ) या मोटारसायकलने पुरा केला. यापूर्वी दिनांक १९ जुलै २०२४ रोजी रश्मी हिने मोटारसायकलने १७ तासात अष्टविनायक दर्शन पुरे केले होते. त्यावेळी पण तिला इंडिया बुक रेकॉर्डस यांनी त्यांच्या रेकॉर्डस मध्ये नोंद घेवून प्रमाणपत्र/मेडल देवुन तीचा सन्मान करण्यात आला होता.
रश्मी परब हिने सदर तीन ज्योतिर्लिंग मंदिरे ११ तास १५ मिनिटामध्ये पुरी केल्यानंतर इंडिया बुक रेकॉर्डस यांनी शहानिशा करून त्याची नोंद त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये घेवून ३ फेब्रुवारी रोजी तिला प्रमाणपत्र आणि मेडल देवंन गौरवण्यात आले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.