पालिका प्रशासनाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे मुक आंदोलन
डोंबिवली ( शंकर जाधव) : डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून मेघडंबरीविना उघड्या स्थितीत आहे. महाराजांची जयंती अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुतळ्याचे सुशोभीकरण अपूर्ण आहे. या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवारी सकाळी ११ वाजता मूक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पुतळ्यावर लवकरात लवकर मेघडंबरी बसवण्याचे तसेच आवश्यक सुशोभीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यांच्या विनंतीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.