दिव्यातील अनंत पार्कवर १८ वर्षांनंतर पालिकेची कारवाई

 



दिवा, (आरती परब)  : ठाण्यातील दिवा पूर्वेच्या चौकातील अनंत पार्कवर महापालिकेकडून तब्बल १८ वर्षांनंतर कारवाई होत आहे. अनंत पार्क सोसायटी मधील तिसऱ्या इमारतील रहिवासी आणि जागा मालक मोहन मढवी यांच्यात वाद सुरू होते. तो वाद कोर्टात जाऊन अनंत पार्कवर अतिक्रमणाची कारवाईचे आदेश आले. ती कारवाई थांबवण्यासाठी अनंत पार्क मधील रहिवासी आम्ही जीव देऊ पण आमचे घर तोडायला देणार नाही. या निर्णयावर आलेले आहेत. त्यावेळी नागरिकांचा संताप दिसून आला. तर काही नागरिक रस्त्यावर उतरुन रस्ताजाम केला होता. तसेच तेथे फास लावून घेतलेला प्रतिकात्मक भला मोठा पुतळा इमारतीच्या मधोमध लावण्यात आला आहे. आमच्या बळीला जबाबदार कोण असा प्रश्न करत पोस्टरबाजी नागरिकांकडून केली जात आहे.


१८ वर्षांआधी बांधलेली अनंत पार्क ही सोसायटी ३ इमारतींची आहे. तर मोहन मढवी यांच्या तिसऱ्या इमारतीमध्ये १४ फ्लॅट सद्या आहेत. त्या फ्लॅटचे ते इमारत मेंटेनस आणि पाणा बील भरत नसल्याने तिसऱ्या इमारतीतील रहिवाशांचा जागा मालकाशी वाद होऊन ते जागेचा सात बारा सोसायटीच्या नावावर करायला गेल्याने तो वाद चिघळला. त्यानंतर जागा मालक मोहन मढवी यांनी उच्च न्यायालयात याचीका टाकून माझ्या जागेत अनधिकृत बांधकाम झाले असून ते तोडण्यात यावे अशी मागणी केली. त्यानंतर कोर्टाने ती मान्य करुन पालिकेला कारवाईचे आदेश दिले. आता सद्या अनंत पार्क या सोसायटी मधील तिनही इमारतींवर अतिक्रमणाची कारवाई आलेली आहे. कोर्टाने पालिकेच्या कमिशनर यांना प्रश्न करुन ही अतिक्रमणाची कारवाई १८ वर्षे का झाली नाही. हे विचारताच पालिकेने तीन आठवड्यांची मुदत घेऊन ती कारवाई करू असे उच्च न्यायालयाला सांगितले आहे. 



या तोड कारवाईची माहिती घेऊन नागरिकांना सांगायला आलेल्या राजेंद्र गिरी, दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. आजच्या त्यांच्या पहिल्या दिवशीच त्यांना मनाविरुद्धची कारवाई करावी लागतेय हे त्यांनी सांगितले. मला कोर्टाचे आदेश असल्याने ही कारवाई करावी लागणार असल्याचे सांगितले. तर नागरिक ही जिवाची पर्वा न करता स्वतःचे घर वाचवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार झाले आहेत. या अचानक १८ वर्षांनी आलेल्या कारवाई मुळे नागरिकांचा संताप होत आहे. तर स्वतःचे राहते घर वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले. तर आमची आयुष्यभराची कमाई आम्ही या घरात घातल्यानंतर आता १८ वर्षांनी घर सोडायला लागल्यास आम्हाला फास लावून घेण्याशिवाय पर्याय नसल्याने फास लावून घेतलेला प्रतिकात्मक भला मोठा पुतळा नागरिकांनी इमारतीच्या मधोमध लावला आहे. आमच्या बळीला जबाबदार कोण असा प्रश्न करत पोस्टरबाजी केली गेली आहे.


अँड आदेश भगत, उपशहरप्रमुख शिवसेना दिवा - उच्च न्यायालयाचे अनंत पार्क सोसायटी वर तोडक कारवाईचे कोणतेही आदेश नसताना पालिका १७ वर्ष जुन्या इमारतींवर कारवाई करते व रहिवाशांना ईमारत खाली करण्यासाठी धमकावत आहे. अनंत पार्क सोसायटीला पोलिसांकडून संरक्षण मिळाव यासाठी लेखी निवेदन दिलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशविना पालिका कारवाईला आली तर तितक्याच आक्रमक पद्धतीने उत्तर दिले जाईल,याची नोंद पालिकेने घ्यावी.




Post a Comment

Previous Post Next Post