अंबरनाथ पालिकेच्या अग्निशमन दलात ७ नव्या गाड्यांचा समावेश होणार

 


अंबरनाथ, ( अशोक नाईक ) : अंबरनाथ शहराची भौगोलिक रचना पाहता... 'काल आज आणि उद्या' विस्तारात विसावलेलं... बदलतंय अंबरनाथ... बैठ्याचाळ वजा घर आणि झोपड्या हळूहळू कात टाकून या वस्त्यांमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे चाळ घर 'टू गेटर लोड बेरिंग उंच होऊ लागल्यामुळे हळूहळू वाढत्या घरांच्या मागणीनुसार आता टोलेजंग इमारती उभारण्यात गृहसंकुल पार्क सोसायटीमध्ये लागलेल्या एक प्रकारे चढा-ओढ स्पर्धेत मात्र पालिकेच्या अग्निशमन दलाच्या फायर क्षमतेवरच सवाल उठू लागला असताना अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकांनी संयुक्तरीत्या उंच शिडीची हायटेक फायर फायटर गाडी खरेदी केलेली आहे. टोलेजंग इमारतीवर मजल्यावर मजले वाढू लागले. मात्र अग्निशमन दलाची स्थिती 'जैसे थे' अवस्थेत राहिली होती. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बळकटीकरण करण्यासाठी या दलाच्या ताफ्यात आता अधिक सक्षम ७ गाड्या दाखल होणार आहेत. त्याकरिता ११ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून नुकतीच त्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे.


अंबरनाथ शहराला शंभर वर्षांची औद्योगिक परंपरा आहे. गेल्या काही दशकात अनेक मोठ्या नामांकित कंपन्या बंद झाल्या. मात्र मोठ्या प्रमाणात विस्तारलेली महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची वसाहत आहे. त्याचबरोबर शहरात तलाव, धरण, खदानींची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर वाढत्या भंगार गोडाऊनची संख्या पाहता सर्रास आगीच्या घटनांना सामोरे जावे लागते. तसेच कंपन्यांमध्ये आग लागणे वायू प्रदूषण पाण्यात बुडून म्हणण्याचे प्रमाण संवेदनशील झाले आहे. या सर्वच घटनांमध्ये अग्निशमन दलाची जबाबदारी मोठी आहे.


गेल्या काही वर्षात अंबरनाथ नगरपालिकेच्या आस्थापनावरील अग्निशमन दलातील मनुष्यबळ सेवानिवृत्तीमुळे कमी झाल्याने नव्याने भरती ऐवजी दुसऱ्या खात्यातील कर्मचारी तसेच प्रशिक्षण घेतलेले वा कंत्राटी कामगारांचा भरणा करून अत्यावश्यक अग्निशमन दलाचा ताफा कसा-बसा चालवला जातोय. दरम्यान मागील काही वर्षात अग्निशमन दलाने पूर्व आणि पश्चिम भागातील अग्निशमन दल केंद्रामध्ये पुरेसे मनुष्यबळ तैनात केले असून आता या ताफ्यात ७ अधिकच्या गाड्या दाखल होणार आहेत. त्यामुळे आता तरी अग्निशमन दल पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार का? असा सवाल बुवा पडा येथील बेकायदेशीर भंगार गोडाऊनला लागणाऱ्या आगच्या घटना पाहता एखादी मोठी आजीची दुर्घटना घडल्यानंतर अंबरनाथ अग्निशमन दलाला बदलापूर, उल्हासनगर, एमआयडीसी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागतं. त्यामुळे अंबरनाथ अग्निशमन दलाची क्षमता वाढवणे गरजेचे असल्याचेही बोलले जात आहे. 


अंबरनाथ नगरपालिका अग्निशमन दल प्रमुख भागवत सोनोने यांनी जिल्हा नियोजन समितीकडे नवीन फायर फायटर व इतर वाहने खरेदीसाठी सादर केलेल्या ११ कोटी ६४ लाख रुपये निधीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्या अनुषंगाने पालिकेच्या भांडार विभागातून ७ वाहनांची खरेदी करण्यासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम अशा दोन अग्निशमन केंद्रासाठी २ फायर वॉटर वाहने वाहने,२ मल्टीपर्पज फायर वाहने, १ वॉटर ब्राउझर,२ क्विक रिस्पॉन्स वाहने अशी साथ अवाहनांची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post