मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जूहू यांच्या वतीने व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या विद्यमाने ९वी अंजिक्यपद कॅरम स्पर्धा दिनांक १६ ते १८ मे रोजी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलनात संपन्न झाली.
यामध्ये पुरुष एकेरी अंजिक्यपद संदिप दिवे ( प्रबोधन कार ठाकरे क्रिडा समिती ) याने सज्जाद शेख ( प्रधान ॲण्ड प्रधान ) याचा २५ -१४ . १६ -२५ . २५ -१० असा पराभव केला आणि विजेतेपद मिळवले. बक्षिस समारंभाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद प्रभू तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संतोष प्र. चव्हाण खजिनदार गौतम जाधव, सदस्य अनिल यादव पंच रमेश चव्हाण तसेच इतर पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.