लघुशंका करताना विजेचा झटका लागून युवकाचा मृत्यू


अंबरनाथ \ अशोक नाईक : मृग नक्षत्रापूर्वी अवकाळी पावसाने चाहूल दिली असताना अंबरनाथ पश्चिम भागातील नवीन भेंडी पाडा परिसरात पाऊस सुरू असताना लघुशंका करण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय तरुणाला नाल्यात असलेल्या वीज प्रवाहाचा झटका लागून त्याचा दुर्दैव मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. यामध्ये विघ्नेश कचरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला.

काही दिवसापूर्वी पश्चिम भागात विजेचा झटका लागून गाभण म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास सोळा वर्षीय विघ्नेश कचरे लघु शंका करण्यासाठी बाहेर गेला असता नाल्यात असलेल्या वीज प्रवाहाचा झटका लागू त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे.मात्र अवकाळी पावसामुळे अंबरनाथ मध्ये विद्युत विभागाच्या पालघरजीपणामुळे निष्पाप तरुणाचा नाहक बळी गेल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post