मुंबई थ्रो बॉल प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात

 


२३ ते २५ मेदरम्यान होणाऱ्या स्पर्धेत १४ संघांचा सहभाग

मुंबई : मुंबईतील थ्रो बॉल स्पर्धांमध्ये विशेष स्थान प्राप्त केलेली मुंबई थ्रो बॉल प्रीमियर लीग (MTPL) – सिझन ३ ची सुरुवात २३ मेपासून होणार आहे. ‘वॉक एन व्हील्स’ आणि मुंबई थ्रो बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धा २३, २४ आणि २५ मे दरम्यान खेळवली जाणार असून यामध्ये पुरुष गटातील ८ आणि महिला गटात ६ अशा संघाचा सहभाग आहे.

सहभागी संघांची यादी:

पुरुष गट (Boys Teams):

  1. मुंबई जग्वार्स (Mumbai Jaguars)
  2. मुंबई पँथर्स (Mumbai Panthers)
  3. मुंबई व्हायपर्स (Mumbai Vipers)
  4. मुंबई ग्लॅडिएटर्स (Mumbai Gladiators)
  5. मुंबई वुल्व्ह्स (Mumbai Wolves)
  6. मुंबई मॅव्हरिक्स (Mumbai Mavericks)
  7. मुंबई बुल्स (Mumbai Bulls)
  8. मुंबई टायटन्स (Mumbai Titans)

महिला गट (Girls Teams):

  1. मुंबई टायटन्स (Mumbai Titans)
  2. मुंबई व्हायपर्स (Mumbai Vipers)
  3. मुंबई जग्वार्स (Mumbai Jaguars)
  4. मुंबई मॅव्हरिक्स (Mumbai Mavericks)
  5. मुंबई पँथर्स (Mumbai Panthers)
  6. मुंबई वुल्व्ह्स (Mumbai Wolves)

स्पर्धेपूर्वी प्लेयर्स लिलाव (Players Auction) देखील आयोजित करण्यात आला होते. या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंचा समावेश असल्याने ही स्पर्धा रंगतदार होणार आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी आयोजक सागर वर्मा (मो.: 84540 57798) यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा पार पडणार आहे.

मुंबईतील खेळाडूंना व्यासपीठ देणारी ही स्पर्धा थ्रो बॉलच्या प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाची असून, सर्व क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून या थरारक लढतींचा आनंद घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post