37 वर्षानंतर जिल्हापरिषद माध्यमिक शाळेच्या माजी विद्यार्थाचा स्नेह मेळावा संपन्न.

 

डोंबिवली / शंकर जाधव :  किल्ले धारुर-- येथील 1984-85 मधील जिल्हा परिषद् माध्यमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा 37 वर्षानंतर स्नेहमेळावा माता श्री.अंबाचंडी मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

या स्नेहमेळाव्यात त्यावेळी दहावीला अ,ब,क ,ड अशा चार तुकड्यात एकूण 180 विद्यार्थी होते त्यापैकी 68 पैकी 54 वर्गमित्र व14 वर्गमैत्रिंणी व फक्त तीन शिक्षकांचा सहभाग होता. स्नेहमिलनाची सुरुवात माता श्री.अंबाचंडी देवीची आरती पुजारी शंकर पुजारी सह सर्व वर्गमित्र-मैत्रिणी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहात करण्यात आली ,यावेळी मंदिर परिसरात वातावरण भक्तीमय होऊन गेले. स्नेहमेळाव्याची सुरुवात जसे शाळेत म्हटले जाते त्याप्रमाणेच राष्ट्रगिताने करण्यात आली.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी निरंतर हे होते. शिक्षकांच्या वतीने सरस्वती देवीच्या फोटोस हार घालून दिप प्रज्वलन करण्यात आले. सूत्रसंचालन अशोक लोकरे परमेश्वर साखरे ,अनिल तिवारी यांनी केले.

या नंतर 1985 ला शाळेत असलेले स्वर्गीय मुख्याध्यापक भगवानराव मुळे,व स्वर्गीय शिक्षक एस. एस. कुलकर्णी एस. व्हि. कुलकर्णी, के.डी.कुलकर्णी ,चोटगार,केकाण सर,वाघमारे,व स्वर्गीय वर्गमित्र सुनिल पिलाजी,सुरेश समर्थ,संपत घाडगे, भारत फुन्ने, काशिनाथ व्यवहारे,सुरेश शेटे,बळीराम तोडकर, चंद्रकांत खवतडकर,अशोक तिबोले,तुकाराम साखरे,चंद्रकांत साखरे,वर्गमैत्रिंणी रेवती महाजन,अनिता पाथरकर यांना उपास्थित वर्गमित्र-मैत्रिनी व माजी शिक्षकांच्या वतीने दोन मिनिट स्तब्ध राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर शिक्षक शिवाजी निरंतर, देविदास साखरे,मेनकुदळे सर,व्यंकटराव नेटके माजी शिक्षणाधिकारी बीड यांचा सत्कार व वर्गमित्र-मैत्रिणिंच्या हस्ते पु्ष्पहार व श्रीफळ,फुलांचा गुच्छ देऊन करण्यात आला. स्नेहमेळावा घेणाची संकल्पना अशोक लोकरे व सोलापूर येथील प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. सत्यशाम तोष्णीवालसह धारुर येथील प्रताप ठोंबरे,राजू गुन्नाल, राजेश निर्मळ, अनिल तिवारी , संतोष दूबे,मनोज डुबे,सुधीर कदम, प्रकाश कामाजी,मनोज डूबे, घनश्याम तोष्णीवाल, आनंदसिंह दिख्खत, मनोज गुंडेवार,राजाभाऊ शिनगारे,राजाभाऊ गावरस्कर, दिगंबर गायकवाड,सुनंदा गायकवाड मँडम,मीरा शिनगारे, रुक्मिण शिनगारे, परमेश्वर साखरे सर, दिपक चिद्रवार, गिरीश पढियार,महेंद्र कोमटवार, बाबू शिंदे,देविदास थोरात,राम कदम यावर्गमित्रांनी पाच वर्षापूर्वी मांडली व त्यानंतर सर्व वर्गमित्रांचे मोबाईल क्रमांक घेऊन व्हाँट्सप ग्रुप तयार केला, यानंतर सर्व वर्गमित्रांना जोडून व सर्वाच्या मताने माजी विद्यार्थी, शिक्षक स्नेहमेळावा रविवारी माता श्री.अंबाचंडी परिसरात घेण्याचे ठरले. तब्बल 37 वर्षानंतर एकत्र येत सर्वाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व अडचणीतील वर्गमित्रांना सर्वानी मिळून मदत करण्याचे ठरले पून्हा शाळा भरल्याचा आनंद घेतला यावेळी निरंतर सर,मेनकुदळे सर व साखरे व व्यंकटराव नेटके माजी शिक्षणाधिकारी बीड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पध्दती विद्यार्थाविषयी असणारी तळमळीची भावना व्यक्त केली. त्यांच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी डॉक्टर,इंजिनिअर,शासकिय व निमशासकिय कार्यालयासह,व्यापार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतआज कार्यरत ठिकाणी काम करीतअसल्याचे कळल्यानंतर अभिमान वाटला. त्यावेळची शिक्षक पध्दती व आताची शिक्षणपद्धती या मधील विसंगती आणि गुरुजनाप्रती असणारा आदर याबाबत सर्व शिक्षकांनी आपले मत मांडले. यावेळी मार्च महिन्यातील जन्मलेले अरुण पवार, प्रताप ठोंबरे, सुधीर कदम, प्रदिप पाथरकर,

सुचिता डुबे, अपर्णा कामाजी,शोभा गावरस्कर या वर्गमित्र-वर्गमैत्रिंणीचा वाढदिवस मोठ्या ऊत्साहात साजरा केला उपस्थित वर्गमित्र-मैत्रिणीनी परिचयात स्वतःची ओळख तसेच सध्या कुटुंबाचा चाललेला व्यवसाय यासंदर्भात सर्वांनी आपापली माहिती कथन केली सर्व वर्गमित्र मैत्रिणीनी शालेय जीवनात झालेल्या घडामोडी, त्यावेळचे प्रसंग सांगत विद्यार्थी, पालक कसे बनत गेलो आणि पूढे पाल्यांना मार्गदर्शन तसेच समाजात आपला मान वाढविण्यासाठी कसे वागले पाहिजे याबाबत अनेकांन समाजाला सल्ला दिला.37 वर्षानंतर एकमेकांना भेटणाचा वर्गमित्र-मैत्रिनी च्या चेहरयावर उत्सूकता, आनंद, मस्ती अशा संमिश्र भावना होत्या.

 स्नेहमेळाव्याला सोलापूर येथील प्रसिद्ध ह्रदय रोग तज्ञ डॉ.सत्यशाम तोष्णीवाल,अनिता बरके, अपर्णा कामाजी,सुचिता डुबे,डॉ.लक्ष्मण वाघमारे कल्याण, डोंबिवली हून प्रसिद्ध पुजारी विलास पारेकर, अनंतमुळे,सर्जेरावआडे, छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयातील शिवाजी नाईकवाडे, कॉम्प्यूटर व्यापारी लक्ष्मिकांत शेटे, दत्तात्रय धारुरकर, अनिता भावठणकर व शोभा गावरस्कर ,परभणी हून जयश्री कोठेकर,जिंतूरहून वंदना भावठणकर,सोलापूरहून अपर्णा कामाजी,अनिता बरके, पुणे येथून लालबहादूर जोशी, असिस्टंट जनरल मँनेजर रिव्ह्युलिस इरिगेशन इंडिया लिमिटेड. बालाजी घोडके, पापासिंग चव्हाण,नांदेडहून जयश्री शेटे, वडवणी येथील विजयराज आँईल ईंडस्टि्जचे मालक विजय अंडिल,परळीहून गंपू माळेकर, संदिप हेडगीरे, प्रदिप पाथरकर बीडहून गिरीश इनामदार,कल्पना गायकवाड अरूण शेटे, पोलिस बि.डी. जाधव, अंबाजोगाई हुन पोलिस मधूकर रोडे, पवनराज होटेल चे मालक सुधीर कदम, अशोक रंदवे,किरण वाघमारे, केजहून प्रसिद्ध ज्वेलर्स प्रकाश कामाजी, नितिन व रतन कोठावळे ,शंकर पाखरे , लोणगावचे कृषितज्ञ प्रताप ठोंबरे, संतोष कुलकर्णी, कळंबहून सुभाष शिनगारे यांची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन अनिल तिवारी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post