दिवा : दिवा विभाग रिपब्लिकन पक्ष (आठवले) यांचे वतीने महिला आघाडीच्या दिवा विभाग अध्यक्षा सौ. शिलाताई त्रिभुवणे यांनी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व मनसे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. दिवा विभागातील शेकडो महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमास भाजपच्या रेश्मा पवार, ज्योती पाटील व महिला सहकारी, मनसेच्या मयुरी पोरजी व निकिता सालप, मानव अधिकार समितीच्या सुवर्णा कदम, सत्याज्योत महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि काळुबाई महिला मंडळच्या अध्यक्षा रोकडे ताई, ख्यातनाम गायिका छाया मोरे यांनीही उपस्थिती दर्शवली.
त्याच बरोबर अभिषेक जाधव, बालाजी कदम, रींगणेकर, विजय पवार, राहुल जोगदंड, राहुल शिंदे, आतिश सर्वाडे व कर्तिका सर्वाडे, सहकरी ही उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व दिवा विभाग कमिटीने मेहनत घेतली होती. एकनाथ भगत, दिनेश पाटील, अनिकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.
महिला आघाडीच्या दिवा विभाग उपाध्यक्ष पुनम ताक व रुपाली पगारे, दिवा विभाग युवक आघाडी उपाध्यक्ष सौरव आढांगळे, यांचे ही कार्यक्रमाला सहकार्य लाभले. त्याच बरोबर दिवा विभागातील रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी हि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले, या बद्दल महीला आघाडी दिवा शहर अध्यक्ष शिला त्रिभुवणे यांनी सर्वांचे आभार मानले.
Tags
महाराष्ट्र