डोंबिवली / शंकर जाधव : जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली जिमखाना मॉर्निंग वॉक आणि योगा ग्रुपच्या वतीने पूर्वेकडील जिमखाना रोडवरील सुर्यावशन मिनी सभागृहात महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद सुर्वे आणि भोरकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रुपच्या वतीने उपस्थित महिलांना गुलाबाचे फुल आणि चॉकलेट देण्यात आले. मनीषा सुर्वे यांचे युट्युबवरील जागतिक महिला दिनाचे मनोगत दाखवण्यात आले.यावेळी अरविंद सुर्वे यांनी महिला सभासदांना भेट वस्तू दिल्या. यावेळी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.
हा कार्यक्रम ग्रुप मधील ज्येष्ठ सभासद अरविंद सुर्वे यांनी आयोजित केला होता. इतर मंडळींनी त्यांना साथ दिली. याप्रसंगी इंटरनॅशनल ह्युमन कौन्सिल तर्फे डेप्युटी डायरेक्टर महाराष्ट्र ठाणे डिस्ट्रिक्ट बोर्ड म्हणून अरविंद सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी डायरेक्टर जनरल उमेद विसारिया उपस्थित होते. अरविंद सुर्वे यांना त्यांचा भावी वाटचालीस खूपशा शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात डोंबिवली जिमखाना आणि मॉर्निंग वॉकचे सर्व सभासद हजर होते.