शिवसेनेकडून पोलीस महिलांचा सत्कार म्हणजे सर्व नारीशक्तीचा सन्मान

 


संदेश पाटील यांचे मत

  डोंबिवली/ शंकर जाधव: दिवसरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांमुळेसामान्य नागरिक सुरक्षित असतात.त्यात महिला पोलिसांचे काम उल्लेखनीय असते. आपले कुटुंब सांभाळून देशासाठी खाकी वर्दी परिधान करून नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलिस महिलांचा सत्कार म्हणजे सर्व नारीशक्तीचा सन्मान असल्याचे शिवसैनिक संदेश पाटील यांनी सांगितले.

     डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगर चौकात शिवसैनिक संदेश हरीश्चंद पाटील यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त हळदीकुंकू आणि होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी हरिश्चंद्र पाटील, संदेश पाटील, डॉ. रसिका पाटील, वपोनी पंढरीनाथ पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी वपोनी पाटील यांनी महिला दिनाचे महत्व सांगितले. यावेळी उपस्थित डॉक्टर्स महिलांचा उपस्थित मान्यवर हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात महिला पोलिसांचा विशेष सत्कार होत असताना उपस्थित महिलांनी टाळ्याच्या कडकडाट कौतुक केले. यावेळी शिवसैनिक संदेश पाटील यांनी महिला पोलिसांचे विशेष कौतुक केले.होम मिनिस्टर कार्यक्रमात पाहण्यासाठी महिलांची गर्दी जमली होती. यावेळी डोंबिवली महिला पत्रकार मयुरी चव्हाण –काकडे आणि रोशनी खोत यांचाही सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post