डोंबिवली / शंकर जाधव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याच्या निषेधार्थ देशभरात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाकडून आंदोलने सुरू झाली आहे. कल्याणमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाअध्यक्ष सचिन पोटे, नागरि विकास सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवीन सिंग, महासचिव ब्रिज दत्त, कल्याण शहर जिल्हा कॉंग्रेस महिला अध्यक्षा कांचन कुलकर्णी , सेवा दल कल्याण शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लालचंद तिवारी आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली.
Tags
महाराष्ट्र