रस्ते सुरक्षेविषयी जागरुकतेसाठी टीसीआयची सेफ सफर मोहीम

 


खास सजविलेल्या ट्रक्सवर नुक्कड नाटकांचे प्रयोग सातत्याने सुरू 

मुंबई: भारताची सर्वात मोठी इंटिग्रेटेड सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक्स उपाययोजना पुरविणारी कंपनी टीसीआय ग्रुपच्या खास सजविलेल्या ट्रक्सवरचे नुक्कड नाटकांचे प्रयोग सातत्याने सुरू आहेत. नुक्कड नाटक – एक पथनाट्य. १९४०च्या दशकात आपला प्रभाव सिद्ध करणारी ही पद्धत पुन्हा एकदा संवाद साधण्याचा एक हमखास मार्ग म्हणून उपयोगाची ठरत आहे. टीसीआय सेफ सफरने रंगीबेरंगी पेहरवातल्या, स्थानिक भाषांत संवाद साधणाऱ्या, चालकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या अभिनेत्यांसह अनोख्या पद्धतीने सादर केलेल्या पथनाट्याने १० लाखांहून अधिक चालकांपर्यंत संदेश पोहोचविण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या पथनाट्याने चालकांच्या मनात सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणीय मुद्द्यांविषयी जागरुकता निर्माण केली आहे.

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (टीसीआय ग्रुप) द्वारे निर्मित टीसीआय सेफ सफर म्हणजे चालकांच्या शिक्षणासाठी चालकांनी उचललेले एक पाऊल आहे. देशात रस्तेसुरक्षेचा संदेश देण्यासाठी चालविण्यात येणाऱ्या इतर मोहिमांपेक्षा हे पथनाट्य वेगळे आहे, कारण इथे खुद्द चालकच या पथनाट्याचे नायक आहेत.

टीसीआय सेफ सफर हा अनोख्या प्रकारचा कार्यक्रम २०१९ पासून सुरू आहे व चालक समुदाय आणि युजर उद्योगक्षेत्राला अनुलक्ष्यून हा प्रयोग राबविला जात आहे. हा केवळ रस्तेसुरक्षा कार्यक्रम नाही, तर देशाला आणि जगालाही सतत चालत्या ठेवणाऱ्या चालकांचा दर्जा उंचावणे हे त्याचे लक्ष्य आहे. चालक नसेल तर सारे जग क्षणार्धात एका जागी थबकून जाईल. मालवाहतुकीचे काम हे जमिनीवर चालते. तंत्रज्ञानाने शंभर शोध लावले तरीही कुशल चालकाचे महत्त्व आहे तसेच राहणार आहे. तरीही देश या समुदायासाठी पुरेसे प्रयत्न करत आहे का या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कधीही मिळत नाही.

सध्या दिल्ली एनसीआर भागातील ग्राहकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी व महत्त्वाच्या जागांवर हा उपक्रम राबविला जात आहे. या नाटकाद्वारे दिल्या जाणाऱ्या संदेशामध्ये ‘इएसजी’ या नव्या वैशिष्ट्याचीही भर पडली आहे. वाहतुकीच्या क्षेत्रातील लोकांना हवामान बदल तसेच प्लास्टिकचा वापर टाळणे, ऊर्जेच्या पर्यायी स्त्रोतांकडे वळणे, विमा आणि ‘चालकांची समावेशकता’ यांसारख्या तत्काळ कृती हाती घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांना या नाटकाच्या निमित्ताने होणाऱ्या चर्चेमध्ये मध्यवर्ती स्थान आहे.



Post a Comment

Previous Post Next Post