डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
डोंबिवली / शंकर जाधव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेसमोर गुढीपाडवा निमित्त लावण्यात आलेले बॅनर काही अज्ञात इसमांनी फाडण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे
डोंबिवली पूर्वेकडे ठाकरे गटाच्या शहर शाखेसमोर गुढीपाडव्यानिमित्त बॅनर लावण्यात आले होते. काल रात्री सुमारास काही अज्ञात इस्मान हे बॅनर फाडले. आज सकाळी बॅनर पाडल्याचे लक्षात येत डोंबिवली ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
बाईट- विवेक खामकर ( शहरप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )