डोंबिवली/ शंकर जाधव : दिव्यातील अपंग व्यक्तीवर मुंब्रा रेल्वे स्थानकात ॲसिड हल्ला झाला. शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घटना घडली. १२ तास उलटूनी जखमी प्रवाश्याला रुग्णालयात बेड मिळाला नसल्याची खंत अपंग व्यक्तीने व्यक्त केल्याचे ॲड.आदेश भगत यांनी सांगितले.
''गर्दुल्ल्याचा त्रास हा दिवसेंदिवस लोकल गाड्यात तसेच स्थानक परिसरात वाढत चालला आहे. लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा बलाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः मुंब्रा रेल्वे स्थानक आणि परिसरात प्रवाशांवर दगडफेक, चालत्या गाडीत प्रवाशांच्या हातावर मारणे, गर्दुल्यांचा वावर खूप जास्त आहे. सुविधांचा विचार करताना प्रवाशांच्या सुरक्षेचा प्राधान्याने विचार केला पाहिजे."
ॲड.आदेश भगत
अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना