डोंबिवली / शंकर जाधव : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा जलतरण स्पर्धेत 50 ब्रे्ट स्टोकमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला. यश जिमखाना स्टाफकडून व प्रशिक्षक विलास माने यांनी भाग्यश्रीचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाग्यश्री विलास माने ही चंद्रकांत पाटकर विद्यालय इयत्ता आठवी मध्ये शिकत असून तिला लहान पणापासून पोहण्याची आवड आहे. वयाच्या पाचव्या वर्षी डोंबिवली मधील यश जिमखान्यात पोहायला शिकली.भाग्यश्रीने मालवण येथे राज्य स्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत चांगले यश मिळवले. यश जिमखाना येथे जलतरण स्पर्धेत 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये गोल्ड मेडल मिळाले.
इंटर स्कूल दादर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत 50 मीटर फ्रिस्टाईल मध्ये गोल्ड मेडल व 50 मीटर ब्रेस्ट स्टोकमध्ये गोल्ड मेडल मिळविले. तसेच जिल्हास्तरीय शालेय क्रीडा जलतरण स्पर्धेत 50 ब्रे्ट स्टोक मध्ये दुसरा क्रमांक आला.